‘सरकारनं लोकशाहीला कुलूप लावलं’ : देवेंद्र फडणवीसांचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आजपासून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. हे अधिवेशन आज आणि उद्या असणार आहे. या अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले आहे.

या अधिवेशनात सरकारने लोकशाहीला कुलूप लावले आहे असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये आपल्या भाषणादरम्यान केला आहे. प्रश्नोत्तरं, तारांकित प्रश्न नसल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांकडून आक्षेप व्यक्त करण्यात आला आहे.याचबरोबर सरकार MPSC बाबत गंभीर नाही. राज्यातील लाखो मुलं परीक्षा, मुलाखती, नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. सरकार, आयोग काय करतंय, असा प्रश्नदेखील देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

तसेच विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची गरज आहे, असेदेखील देवेंद्र फडणवीस म्हणाले. यामुळे आता २ दिवसांचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. याबरोबर विरोधक मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण या मुद्द्यांवरून घेरण्याची शक्यता आहे. यामुळे आता विरोधक सरकारवर वरचढ होतात कि सरकार विरोधकांना पुरून उरेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment