गर्लफ्रेंडच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित झाल्यावर बॉयफ्रेंडचा आला संशय, इंटरनेटच्या हिस्ट्रीने उघड केली अनेक रहस्ये !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमेरिका । कोणतेही प्रेमसंबंध भरोसा आणि विश्वासावर आधारित असतात. पण जेव्हा विश्वासावर शंका घेतली जाते तेव्हा संबंध तुटतात. आजकाल एका जोडप्याशी संबंधित या बातम्या चर्चेचा विषय बनल्या आहेत. या दोघांची कथा एका चित्रपटासारखीच आहे ज्यात प्रेम आहे, रोमान्स आहे आणि फसवणूक देखील आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रियकराने फसवणूक करण्यासाठी आपल्या गर्लफ्रेंडलाच निवडले. तो त्याच्याच गर्लफ्रेंडच्या हत्येचा आरोपी बनला आहे. अमेरिकेतील ही बातमी सर्वांना आश्चर्यचकित करणारी आहे.

अमेरिकेतील ऑक्सफर्ड शहरात 21 वर्षीय Alexandria Kostial च्या निर्घृण हत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. तिचे मित्र अलेक्झांड्रियाला एली म्हणायचे. ती मिसिसिपी विद्यापीठात मार्केटिंग शिकत होती. मिरर वेबसाइटनुसार, एली कॉलेजमध्ये Brandon Theesfeld च्या प्रेमात पडली. मात्र ब्रॅंडन हा खूपच विचित्र व्यक्ती होता. एका क्षणात तो एलीशी प्रेमाने बोलायचा आणि दुसऱ्याच क्षणी तो तिच्यावर चिडायचा.

या वर्षी एप्रिलमध्ये, एलीने ब्रँडनला मेसेजद्वारे सांगितले की, ती बहुधा प्रेग्नन्ट आहे आणि तिने तिच्या होम टेस्टचे रिझल्ट ब्रँडनला पाठवले. मात्र त्यानंतर ब्रॅंडनने एलीला गर्भपात करण्यास सांगितले. दोघांमध्ये बराच वाद झाला कारण एलीला गर्भपात करू नये अशी इच्छा होती. 19 जुलै रोजी एली एका नाईट क्लबमध्ये गेली. तिथून निघाल्यानंतर ती सीसीटीव्हीमध्येही दिसली. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह एका तलावाजवळ सापडला. तिला 8 वेळा गोळ्या घालण्यात आल्या.

इंटरनेट हिस्ट्रीने उघड केली अनेक रहस्ये
जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरू झाला, तेव्हा मित्रांचे स्टेटमेंट घेण्यात आले. ज्यामधून असे कळले की ब्रॅंडनला एलीने बाळाला जन्म देऊ नये असे वाटत होते आणि यावरूनच दोघांमध्ये भांडणे सुरू असत. पोलिसांनी ब्रॅंडनचा शोध सुरू केला. त्यानंतर पोलिसांना जे काही कळले ते थक्क करणारे होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ब्रँडनला त्याची गर्लफ्रेंड प्रेग्नन्ट असल्याचे कळले तेव्हा त्याने इंटरनेटवर गर्भपाताचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली. तसेच डॉक्टरांचा शोध सुरू केला. यामुळे पोलिसांना ब्रँडन काय आहे याची कल्पना आली. प्रेग्नन्ट असल्याची बातमी मिळाल्यानंतर तो आपल्या वडिलांच्या घरी गेला जिथून त्याने सोशल मीडियावर बंदुकीसह फोटो क्लिक केला. त्याने ती बंदूक सोबत आणली होती.

एवढेच नाही, तर त्याच्या कॉम्पुटरवरील इंटरनेट हिस्ट्रीने हे देखील उघड केले की, ब्रँडनने बंदूक सायलेन्सर, बुलेट आणि फेस मास्कबद्दल देखील सर्च घेतला. ब्रँडनने सीरियल किलर्सबद्दल नेट सर्च केला आणि ते लोकांना कसे मारतात याची माहिती घेतली. पोलिसांनी ब्रॅंडनला या प्रकरणात आरोपी मानले. मृतदेह सापडलेल्या तलावाजवळ त्याची कार दिसली आणि जिथे त्याने आदल्या रात्री एलीला भेटायला बोलावले होते. एवढेच नाही तर त्यांच्याकडून जप्त केलेल्या बंदुकीच्या गोळ्या एलीच्या शरीरात सापडलेल्या गोळ्यांसारख्याच होत्या. ब्रॅंडनला हत्येसाठी दोषी ठरवण्यात आले होते आणि या सप्टेंबरमध्ये त्याने न्यायालयात गुन्हा कबूल केला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा एलीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला तेव्हा कळले की ती प्रेग्नन्ट नाही.

Leave a Comment