कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कुडाळ (ता. जावळी) येथील युवा लघु चित्रपट निर्माते दिग्दर्शक अरीश इम्तियाज मुजावर यांना आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये आर. जे. केराबाई या डॉक्युमेंटरीसाठी गाैरविण्यात आले. पुणे येथे आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट फेस्टिवलमध्ये जगभरातून विविध लघु चित्रपट नामांकनासाठी आले होते. या फेस्टिवलमध्ये अरीश मुजावर यांचा सन्मान करण्यात आला.
माण तालुक्यातील रेडिओ आरजे म्हणून काम बघणाऱ्या आर. जे. केराबाई यांच्यावर व यांच्या जीवनशैलीवर इंग्रजी मधून लघु चित्रपट डॉक्युमेंटरी बनविण्यात आली आहे. नामांकनासाठी आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट फेस्टिवलमध्ये पाठवण्यात आली होती. लघु चित्रपट शॉर्ट फिल्म पाहिल्यानंतर अरीश मुजावर यांचा विशेष गौरव करण्यात आला. हरीश मुजावर यांनी आतापर्यंत 25 लघु चित्रपटाची विविध सामाजिक विषयांवर निर्मिती केली आहे.
समाजातल्या शेवटच्या स्तरापर्यंत जाऊन समाज घटनांवर डोळ्यात अंजन घालणाऱ्या व समाज प्रबोधनात्मक लघु चित्रपटाची व शॉर्ट फिल्मची निर्मिती करून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न चित्रपट दिग्दर्शक निर्माते हरीश मुजावर यांनी केला आहे याचा सन्मान आणि गौरव विविध ठिकाणी करण्यात आला आहे त्यांच्या या यशाबद्दल जावळी सातारा जिल्ह्यात विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे