सांगली | रात्रीच्या साडेबारा वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचा मुलाला फोन केला. सांगली जिल्ह्यासाठी ऑक्सिजन टॅंकर पाठवला आहे, स्वतः सांगलीला जाऊन तो उतरुन घे असा निरोप रोहितला फोनवरून मिळाला. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता रोहित पाटील यांनी लगेचच सांगली गाठली.
सांगली येथे २३ जंबो टॅंकरसह दोन ड्यूरा ऑक्सिजन सिलेंडर घेऊन रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील ग्रामीण रुग्णालय गाठले. साहित्य उतरेपर्यंत पहाट झाली. परंतू रोहित पाटील तेथेच ठाण मांडून राहिले होते. कोरोनामुळे रुग्ण दगावू नयेत, यासाठी रोहित पाटील यांनी अक्षरक्षः रात्र जागून काढली. हे पाहून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसह आरोग्य विभागही अवाक झाला होता. ऑक्सिजन टॅंकर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी रोहित पाटील यांनी राज्य सरकारकडे केली होती.
परिस्थितीचे गांभिर्य सरकारच्या निदर्शनास आणून देत होते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे त्यांनी ऑक्सिजन टँकरची मागणी रोहित यांनी लावून धरली होती. शनिवारी तासगाव शहरात ऑक्सिजन पुरवून वापरण्यात येत होता. काही वेळ रुग्णांना ऑक्सिजन शिवाय बसावे लागले होते. रोहित पाटील यांनी ही बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितली. यानंतर मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑक्सिजनचा एक टॅंकर सांगलीला पाठवला. टॅंकर सांगलीला रवाना होताच मध्यरात्री अजित पवार यांनी रोहित पाटीलला फोन केला. यानंतर रोहित पाटील यांनी उशिरापर्यंत भारत गॅसच्या वितरण केंद्रावर बांबून ऑक्सिजनचा टॅंकर उतरुन घेतला.