अवकाळी पावसाने शेतकरी पुन्हा संकटात ; परभणीतील ३ तालुक्यात रब्बीचे प्रचंड नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

परभणी जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने पालम, गंगाखेड व सोनपेठ तालुक्यात रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाल आहे. मागील सात वर्षापासुन फेब्रुवारी-मार्च महिन्यात ऐन रब्बी पिके काढणीच्या वेळेला होणाऱ्या अवकाळी पाऊस व गारपीठीने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बुधवार दि १८ मार्च रोजी जिल्ह्यातील दक्षिणेकडील पालम, गंगाखेड व सोनपेठ तालूक्यातील गावच्या परिसरामध्ये संध्याकाळच्या सुमारास वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामध्ये दहा ते पंधरा मिनिट मोठमोठ्या गारा पडल्या आहेत. यामूळे शेतात उभ्या असलेल्या गहू, हरबरा,ज्वारी सारख्या पिकांसह फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास, पुन्हा एकदा हिरावून घेतला आहे. दरम्यान जिल्ह्यात अन्य भागातही कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे झालेल्या नुकसानीने पुन्हा एकदा शेतकरी चिंतेत सापडला असुन रब्बीपिक पंचनामे करून रब्बी विमा व पिकनुकसान भरपाई देण्याची मागणी स्थानिक शेतकरी वर्गातुन आता होत आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment