Video : तासवडे टोलनाक्यावर राडा : शिवीगाळ करत दोन महिलांसह 6 जणांना लाथाबुक्क्यांनी मारहाण

0
123
Taswade Toll Plaza
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | पुणे- बेंगळोर महामार्गावर टोल भरण्याच्या कारणावरून कराड जवळ असणाऱ्या तासवडे टोलनाक्यावर 12 ते 15 जणांनी सहा जणांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ धमकी दिल्याची घटना रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. कोल्हापूर येथून साखरपुड्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पुण्याच्या दिशेने निघालेल्या ट्रव्हल्सचा टोल भरण्यावरून हा राडा झाला.

रविवारी दि. 24 ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडली असून याबाबतची फिर्याद तळबीड पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. शबाना इलियास शेख ,बहीण रुक्सार,भाऊ रेहान चांद गोलंदाज, मामा शेख महंमद, रफिक बाबू गोलंदाज व अब्दुल सुतार अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. याबाबत शबाना इलियास शेख (रा. आझाद चौक निगडी,पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/3191106784441675

तळबीड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, कोल्हापूर हून साखरपुड्याचा कार्यक्रम करून सोमवारी रात्री बस क्रमांक (एम.एच. 12 केजी 9959) या बसने पुणे येथे निघाले होते. या दरम्यान, तासवडे टोलनाक्यावर रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास बस आली असता टोलनाक्यावरील 7 नंबर लेन्थवरील बुथवर टोल भरण्यासाठी टोल कर्मचारी फास्टॅग स्कॅनिंग करीत असताना स्कॅनिंग होत नव्हते. यावेळी बस चालक व टोल कर्मचारी यांचे बोलणे सुरू असताना, टोल कर्मचारी बस चालकाला शिवीगाळ करू लागला. यावेळी बसमधील फिर्यादी यांचे नातेवाईक वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असताना कर्मचारी शिवीगाळ करू लागला.

यावेळी बसमधील अन्य नातेवाईक खाली उतरले असता, टोल नाक्यावरील 12 ते 15 जणांनी पळत येऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी महिलांना ही शिवीगाळ केली. तर यावेळी एका नातेवाईकाचा मोबाईल पडला तर एकाचा फुटला तसेच भांडणांचा शुटींग करणाऱ्या अन्य नातेवाईकांना मोबाईल मधील शुटींग डिलीट कर अशी धमकी दिली. या दरम्यान तळबीड पोलिस ठाण्याचा कर्मचारी टोल नाक्यावर येताच मारहाण करणारे पळून गेले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आली असून 12 ते 15 जणांवर तळबीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार भगवान माने करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here