हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बंडखोरी करत उभे राहिलेल्या सत्यजित तांबे यांना भाजपकडून पाठींबा देण्यात आलेला आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच केली.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी यावेळी त्यांनी सत्यजित तांबे यांच्या पाठिंब्याबाबत विधान केले. ते म्हणाले की, स्थानिक कार्यकर्त्यांच्या पातळीवर तांबे यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. सत्यजित तांबे तरुण, होतकरू आहेत. त्यांना संधी दिली पाहिजे. म्हणूनच आमच्या कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे.
भाजपकडून सत्यजित तांबे यांना पाठींबा देण्यात आला असून तांबे यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या उतरल्या आहेत. त्यांना महाविकास आघाडीच्या वतीने पाठिंबा दर्शविण्यात आला आहे.