राधानगरी अभयारण्यात भीषण आग ; आग विझवण्यासाठी तरुणाईचे शर्थीचे प्रयत्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर | सतेज औंधकर

कोल्हापूरच्या राधानगरी अभयारण्यात आज मोठ्या प्रमाणावर वनवा पेटला. त्यामुळे अभयारण्यात आग लागली असून, शेकडो एकर परिसरातील जैवविविधतेची हानी झाली आहे. आगीचा तडाखा इतका भीषण होता की बघता बघता शेकडो एकर परिसरातील वनसंपदा बेचिराख झाली. कोल्हापूर काळम्मावाडी मार्गावर गैबी वन तपासणी नाक्यापासून अवघ्या कांही अंतरावर ही आग लागली आहे. ही आग अद्यापही सुरूच असून प्रशासनाला जाग आली असल्याचे दिसून येत नाही.

राधानगरी जंगलात लागलेली आग

दुसऱ्या बाजूला या मार्गावरून ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र सुमारे तासभराच्या प्रयत्नानंतरही त्यांना ही आग आटोक्यात आणता आली नाही. त्यामुळे त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही कळविले आहे. विशेष म्हणजे या भागात वन्यजीव मोठ्या प्रमाणावर आढळतात. त्यामुळेही ही आग तात्काळ आटोक्यात आणण्याची गरज व्यक्त केली जात आहे. एका बाजूला विभागातील वनवे विझवा आणि वनसंपदा वाचवा असे वन विभागाकडून आव्हान केले जाते. मात्र प्रत्यक्षात आग लागल्यानंतर वन विभागाच्या ते तात्काळ लक्षात येत नाही. याबद्दलही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या वणव्याच्या बाबतीतही असाच प्रकार दिसून येत आहे..