रघुराम राजन भारत जोडो यात्रेत सहभागी; काँग्रेसमध्ये जाणार??

0
169
raghuram rajan join in bharat jodo yatra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या राजस्थान मध्ये असून यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सहभाग घेतला. यावेळी राजस्थानमधील काँग्रेस नेते सचिन पायलटही उपस्थित होते. राजन यांना भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत चालताना पाहून ते काँग्रेस मध्ये प्रवेश करणार का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

राजस्थानातील सवाई माधोपूर येथील भदोती येथून आज सकाळी भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली. यावेळी रघुराम राजन यांनी सहभाग घेत राहुल गांधी आणि काँग्रेसला आपला पाठिंबा दर्शवला. यावेळी राहुल गांधींसोबत त्यांनी विविध विषयांवर चर्चा सुद्धा केली.

दरम्यान, कन्याकुमारी पासून सुरु झालेली भारत जोडो यात्रा आता राजस्थान पर्यंत पोचली आहे. भारत जोडो यात्रेला सर्वसामान्य जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. राहुल गांधी थेट जनतेमध्ये मिसळून त्यांच्या भावना जाणून घेत आहेत. भारत जोडो यात्रेच्या माध्यामातून एका नवीन राहुल गांधींचा उदय झालेला पाहायला मिळत आहे.