हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T 20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला आहे. इंग्लंड कडून तब्बल 10 गडी राखून भारताला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी थेट BCCI वर निशाणा साधत त्यांच्या प्रश्नचिन्ह निर्माण करणारं विधान केल आहे.
सामना संपल्या नंतर राहुल द्रविडने मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, भारतीय खेळाडू आयपीएल व्यतिरिक्त जगातील कोणत्याही टी-20 लीगमध्ये खेळत नाहीत. पण इतर देशांतील खेळाडूंच्या बाबतीत असे होत नाही. इंग्लंडला विजय मिळवून देणारा अॅलेक्स हेल्स ऑस्ट्रेलियाच्या T20 लीग बिग बॅशमधील अव्वल खेळाडूंपैकी एक आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफनेही बिग बॅशमध्ये भरपूर क्रिकेट खेळले आहे. परदेशी लीगमध्ये खेळल्याने आमच्या खेळाडूंना नक्कीच फायदा होईल. परंतु हा निर्णय बीसीसीआयला घ्यायचा आहे . मात्र भारतीय खेळाडूंना बीबीएलमध्ये खेळता येणार नाही. कारण तेव्हा भारतात देशांतर्गत स्पर्धा सुरू असतात असं द्रविड यांनी म्हंटल.
दरम्यान, आजच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाचा १० गडी राखून धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 6 गड्यांच्या मोबदल्यात 168 धावा केल्या. भारताकडून हार्दिक पंड्याने सर्वाधिक 63 धावा केल्या तर विराट कोहलीने 50 धावा बनवल्या. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची अपयशाची मालिका या सामन्यातही कायम राहिली. त्याचा फटका भारतीय संघाला बसला.
169 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने सुरुवाती पासूनच आक्रमक पवित्रा घेत भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवला. इंग्लंडचे सलामीवीर जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी चौफेर फटकेबाजी करत भारतीय गोलंदाजांची पिसे काढली. बटलरने अवघ्या 49 चेंडूत 80 धावा केल्या तर दुसरीकडे अॅलेक्स हेल्सने 47 चेंडूत 86 धावा कुठल्या. भारतीय गोलंदाजांना इंग्लंडचा एकही फलंदाज बाद करता आला नाही. या पराभवामुळे भारतीय संघाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. आता फायनल मध्ये इंग्लंडचा सामना पाकिस्तानसोबत होईल.