राहुल गांधी ED कार्यालयात दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नॅशनल हेराल्ड केस प्रकरणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना समन्स बचावल्यानंतर ते आज अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी समोर हजर झाले. त्यामुळे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून आक्रमक पावित्रा घेतला जात आहे.

राहुल गांधी यांना समन्स बजावल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी दिल्लीत ईडी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली दरम्यान आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

ईडीच्या प्रकाराविरोधात निषेध दर्शवण्यासाठी काँग्रेसने पक्ष कार्यालयापासून ते ईडीच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यासाठी परवानगी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून मागितली होती. मात्र दिल्ली पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी काँग्रेसच्या या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली.

काँग्रेस नेत्यांनी फेटाळले आरोप

मनी लॉडरिंगप्रकरणी राहुल गांधी यांना समन्स बजावण्यात आलेले आहे. या प्रकरणी ईडीकडून त्यांच्यावर जे आरोप करण्यात आलेले आहेत. ते काँग्रेस नेत्यांनी फेटाळून लावले आहेत. ईडीचे आरोप हे पूर्णपणे निराधार आहे, असे काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. ईडी भाजपच्या सदस्य किंवा ज्या राज्यांत भाजपची सत्ता आहे तिथे पोहोचत नाही, अशी टीकाही चिदंबरम यांनी केली आहे.