Thursday, October 6, 2022

Buy now

विधानपरिषद निवडणूक बिनविरोधाचा प्रस्ताव आल्यास…; चंद्रकांतदादांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील दहा विधान परिषदेच्या जागेसाठी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे. दहा जागांसाठी 12 अर्ज दाखल आहेत. महाविकासच्या वतीने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी प्रत्येकी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, तर भाजपच्यावतीने पाच उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. हि निवडणुकी बिनविरोध करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव आल्यास देवेंद्र फडणवीस निर्णय घेतली, असे मत पाटील यांनी मांडले आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी चुरस वाढली आहे. हि निवडणूक बिनविरोध करण्याबाबत राजकीय पक्षांकडून प्रयत्नही केले जात आहे. याबाबत चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पाटील म्हणाले की, या निवडणुकीत आम्ही सहा उमेदवार उभे केले आहेत. आमच्या पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस व मी स्वतः याबाबत प्रस्ताव आल्यास त्याबाबत निर्णय घेऊ. त्याबाबत सर्वोतोपरी प्रस्तावाबाबत विचार करून फडणवीसच निर्णय घेतील, असेही शेवटी पाटील म्हणाले.

निबडणूक बिनविरोध व्हावी अशी काँग्रेसची भूमिका

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्वाचे विधान केले. “विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी अशी काँग्रेसची भूमिका आहे,असे पटोले यांनी म्हंटले आहे.