रात्री राहुल गांधींच्या फोन नंतर राऊतांचे ट्विट; म्हणाले कि,

Sanjay Raut Rahul Gandhi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. राज्यातले अनेक प्रमुख नेते या यात्रेमध्ये सहभागीही झाले होते. या यात्रेदरम्यान, राहुल गांधी यांनी मध्यरात्री आपल्याला फोन केला होता. त्यांच्या फोननंतर राऊतांनी एक ट्विट केले आहे. फोनद्वारे त्यांनी माझ्या तब्येतीची विचारपूस केली असल्याचे राऊतांनी म्हंटले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याविषयीचे एक ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हंटले आहार की, “भारत जोडोत व्यस्त असुनही राहुल यांनी रात्री फोन करुन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती, असे म्हणाले. राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात 110 दिवस यातना दिल्या याचे दु:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा ओलावा संपला आहे. यात्रेत तो दिसतोय….” असे राऊतांनी म्हंटले आहे.

दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत युती तुटू शकते, असे म्हंटले होते. राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना णर्ज असल्याची चर्चा सुरु होती. आता राहुल गांधी यांनी थेट राऊतांना फोन करत त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केल्याने राऊतांनी ट्विटद्वारे सांगितले आहे.