Wednesday, October 5, 2022

Buy now

भारत जोडो यात्रेतील काँग्रेस नेते राहुल गांधींचा अनोखा व्हिडिओ जोरदार वायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – राहुल गांधी (rahul gandhi) काहींना काही कारणाने चर्चेत राहत आहेत. भारत जोडो यात्रेत सहभागी नोंदवत त्यांनी संपूर्ण भारत दौरा सुरू केला आहे. या यात्रेत मात्र ते (rahul gandhi) काही ना काही कारणाने चर्चेचा विषय ठरत आहेत. मग त्यात त्यांचा हजारो किंमतीचा पांढरा टी शर्ट आणि आता केरळ मधला त्यांचा एक व्हिडिओ जोरात वायरल होत आहे.

भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्यात सध्या राहुल गांधी (rahul gandhi) केरळ मध्ये दाखल झाले आहेत. या दौऱ्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ मोठया प्रमाणात वायरल होत आहेत. केरळ मधीलच राहुल गांधींचा (rahul gandhi) एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय झाला आहे, ते म्हणजे या व्हिडिओत खुद्द राहुल गांधी चक्क स्नेक बोट चालवत आहेत.केरळच्या पुननमदा तलावात बोट शर्यतीच्या प्रदर्शनात चक्क काँग्रेस नेते राहुल गांधी सहभागी झाले होते. यावरून हे लक्षात येते की स्नेक बोट चालवून राहुल गांधी केरळच्या संस्कृतीशी आपल्याला जोडू पाहत आहेत.

या व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकतो की या बोटीमध्ये राहुल गांधी (rahul gandhi) मधोमध बसलेले आहेत. तर त्यांनी साधी पॅन्ट आणि पांढऱ्या रंगाचा टी शर्ट परिधान केला आहे. बोट चालवताना त्यांचा एक पाय बोटीच्या किनाऱ्यावर तर एक बोटीत आणि हातात चप्पू दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय