हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या मोहिमेवर असून सध्या त्यांची यात्रा कर्नाटकात आहेत. आज त्यांच्या आई आणि काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधीही भारत जोडो यात्रेत सामील झाल्या. त्यातच राहुल गांधींचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते भर रस्त्यात सोनिया गांधींच्या बुटांची फीत बांधताना दिसत आहे.
सोनिया गांधी यांनी मंड्या जिल्ह्यातील डाक बंगला भागातून पदयात्रेला सुरुवात केली. त्या प्रथमच ‘भारत जोडो यात्रे’मध्ये सामील झाल्या आहेत. यावेळी राहुल गांधी यांचा सोनिया गांधींच्या बुटाच्या फेस बांधतानाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लोक राहुल गांधींचे कौतुकही करत आहेत. शशी थरूर यांनीही हा फोटो शेअर करत आई ही आई असते, तिला तोड नाही असं म्हंटल आहे.
वो साँस भी लेती है तो, उनमें भी दुआएं होती हैं
माँओं का तोड़ नही होता, माएँ तो माएँ होती हैं !🙏#BharatJodoYatra @INCIndia pic.twitter.com/npjsJnCah3— Shashi Tharoor (@ShashiTharoor) October 6, 2022
दरम्यान, बऱ्याच दिवसांनी सोनिया एका सार्वजनिक कार्यक्रमात हजर झाल्या आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी गेल्या काही निवडणुकांमध्ये प्रचारही केला नव्हता. आज त्यांनी भारत जोडो यात्रेत सहभाग घेतल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या काही महिने अगोदर मंड्यातील सोनिया गांधींची पदयात्रा या अर्थानेही लक्षणीय आहे की, हे देवेगौडा कुटुंबाचे वर्चस्व असलेले क्षेत्र मानले जाते. सोनिया गांधी या यात्रेत सामील झाल्या हा ऐतिहासिक क्षण आहे. यामुळे कर्नाटकात पक्ष आणखी मजबूत होईल अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दिली.