राहुल गांधींनी उपस्थित केला महात्मा गांधींच्या हत्येचा मुद्दा; म्हणाले की..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । सध्या भारत जोडो यात्रेवर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी गांधीजींच्या हत्येचा मुद्दा उपस्थित करत गांधींची हत्या करणाऱ्या विचारसरणीविरोधात आपला लढा सुरूच आहे असं म्हंटल आहे. तसेच सत्तेत असलेल्यांना महात्मा गांधींचा वारसा बळकावणे सोपे आहे, पण त्यांच्या पावलावर पाऊल टाकणे अवघड आहे असा टोलाही भाजपला लगावला.

राहुल गांधी म्हणाले, ज्या विचारसरणीने महात्मा गांधींची हत्या केली, त्या विचारसरणीच्या विरोधात आपला लढा कायम आहे. या विचारसरणीने गेल्या आठ वर्षांत देशात विषमता आणि विभाजन केलं आहे. या लोकांनी कष्टाने मिळवलेले स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे. आम्ही भारताच्या त्या महान सुपुत्राचे स्मरण करतो आणि त्यांना आदरांजली वाहतो. विचारधारांची लढाई सुरू आणि यामध्ये लोकांनी सहभागी व्हावे असेही त्यांनी म्हंटल.

तत्पूर्वी राहुल गांधी यांनी ट्विटरवरूनही गांधीजींना आदरांजली वाहिली आहे. बापूंनी आपल्याला सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्याची शिकवण दिली. प्रेम, करुणा, सौहार्द आणि मानवता याचा अर्थ समजावून सांगितला. आज गांधी जयंतीच्या दिवशी आपण प्रतिज्ञा घेऊ की, ज्याप्रमाणे त्यांनी अन्यायाविरुद्ध देशाला एकत्र केले, त्याचप्रमाणे आपणही आपला भारत एक करू.