नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शायरीच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधला आहे. सध्या पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये सीमावाद सुरु आहे. तिथे काही भागांमध्ये दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी भारताच्या संरक्षण धोरणाचे समर्थन करताना एक विधान केले होते. त्यावरुन राहुल गांधींनी अमित शाह यांना लक्ष्य केले आहे.
‘भारताच्या संरक्षण धोरणाला जागतिक मान्यता मिळाली आहे. अमेरिका आणि इस्रायलनंतर आपल्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी कुठला देश सक्षम असेल तर, तो भारत आहे. संपूर्ण जगाने हे मान्य केले आहे’ असे विधान अमित शाह यांनी बिहारमधील डिजीटल सभेला संबोधित करताना केले होते. अमित शाह यांचे हे विधान टि्वटरवर शेअर करताना राहुल गांधी यांनी शायरीच्या माध्यमातून टोला लगावला आहे.
”सब को मालूम है ‘सीमा’ की हक़ीक़त लेकिन,
दिल के ख़ुश रखने को, ‘शाह-यद’ ये ख़्याल अच्छा है।”
हा शेर ट्विटवर शेअर करत राहुल यांनी अमित शहांना चिमटा काढला. दरम्यान, लडाख भागातील चीन बरोबर सुरु असलेल्या सीमा वादाच्या दोन्ही बाजुंनी चर्चेच्या माध्यमातून वादावर तोडगा काढण्याचे ठरवले आहे.
सब को मालूम है ‘सीमा’ की हक़ीक़त लेकिन,
दिल के ख़ुश रखने को, ‘शाह-यद’ ये ख़्याल अच्छा है।https://t.co/cxo9mgQx5K— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 8, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”