मोदी आणि अदानी एकच; राहुल गांधींचा हल्लाबोल

modi adani gandhi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अदानी आणि मोदी एकच आहेत असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जोरदार घणाघात केला आहे. छत्तीसगडमधील रायपूर येथे सुरू असलेल्या तीन दिवसीय काँग्रेस अधिवेशनाचा रविवारी शेवटचा दिवस आहे. या संमेलनाला संबोधित करताना राहुल गांधी यांनी अनेक विषयांवर भाष्य करताना केंद्र सरकारवर टीका केली. तसेच भारत जोडो यात्रेतील त्यांच्या अनुभव सुद्धा सांगितला.

देशातील सगळा पैसा फक्त एकाच व्यक्तीकडे जात आहे. देशातील विमानतळे, बंदरे, संरक्षण साहित्ये, पायाभूत सुविधा, ऍग्रीकल्चर स्टोरेज हे सर्व पैसे एकाच व्यक्तीच्या हातात जात आहे. आणि जेव्हा आम्ही पंतप्रधानांना विचारतो कि अदानी ६०९ क्रमांकावरून दुसऱ्या नंबर वर कसे आले? तुमचं आणि त्यांचं नातं काय आहे ? तेव्हा संसदेत आमचा आवाज बंद केला होता. भाजप आणि आरएसएसला अदानींना संरक्षण देण्याची गरज का भासत आहे? असा सवालही राहुल गांधींनी केला.

यावेळी राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेबाबतचा अनुभव सुद्धा सांगितला. भारत जोडो यात्रेत चालताना मला खूप त्रास होत होता, पण मी हा त्रास कधीच जाणवू दिला नाही. भारत जोडो यात्रेतून मला खूप काही शिकायला मिळालं. त्या यात्रेदरम्यान, मी अनेक शेतकऱ्यांना भेटलो आणि त्यांचे दुःख जाणून घेतले असं राहुल गांधी म्हणाले. केरळमध्ये मी बोटीत बसलो होतो. माझ्या पायात खूप वेदना होत होत्या. त्या फोटोंत मी हसताना दिसतोय, पण मनातल्या मनात मी रडत होतो अशी आठवणी सुद्धा त्यांनी सांगितली.