नवी दिल्ली | गरिबांच्या घराबाहेर चौकीदार नसतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेसाठी चौकीदार नाहीत, तर अनिला अंबानी सारख्या उद्योजकांची चौकीदारी मोदी करतात, अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. झारखंड येथे काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी त्यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली. तत्पुर्वी येथे राहुल यांच्या भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेसच्या जाहिनाम्याबाबत बोलताना ते म्हणाले की, देशात पहिल्यांदाच आदिवासी जमीन संपादनसंदर्भात कायदा आणला जाईल. छत्तीसगढच्या बस्तरमध्ये हा निर्णय लागू करण्यात आला आहे. अशी माहिती दिली.
याअंतर्गत अदिवासी समाजाच्या मालकी हक्क असलेल्या जमिनी कुठलेही सरकार त्यांच्या परवानगीशिवाय संपादित करु शकत नाही. तसेच पाच वर्ष उद्योगपत्यांनी संपादित केलेल्या जमिनींवर कुठल्याच प्रकारे प्रकल्प उभारले नाही, तर त्या जमिनी संबंधित मालकी हक्क असलेल्यांना परत केल्या जातील, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.