मुंबई प्रतिनिधी | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. महाराष्ट्रात मुंबई आणि धुळे या ठिकाणी त्यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी लोकसभेचा निवडणुकीसाठी या सभा महत्वपूर्ण ठरणार आहेत.
धुळ्यात त्यांची पहिली सभा दुपारी २ वाजता होणार आहे . तर मुंबई मध्ये वांद्रे येथील एमएमआरडी च्या मैदानावर ५ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या माध्यमातून काँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराला सुरवात होणार आहे. राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाआघाडी निश्चित झाली आहे.
राहुल गांधी यांच्या दौऱ्या निमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांकाडून अनेक ठिकाणी त्यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत.धुळ्याती सभेसाठी सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण हे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. सभेसाठी बंधिस्त आलिशान मंडप टाकण्यात आले आहेत. तसेच सभेनिमित्त वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.
इतर महत्वाचे –
डॉ.अमोल कोल्हेचा शिवसेनेला रामराम,’या’ पक्षात करणार प्रवेश
पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यास दारु तस्करांची मारहाण
आदिवासींना जंगलातून हाकलून देणे अन्यायकारक – एड. लालसू नोगोटी