राहुल गांधींनी कलाकारांसोबत लुटला ड्रम वाजवण्याचा आनंद; Video व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखालील भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी थेट जनतेमध्ये मिसळून लोकांशी संवाद साधत आहेत. याच दरम्यान,त्यांनी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे सांस्कृतिक कार्यक्रमात कलाकारांसोबत ड्रम वाजवत आनंद लुटला . यावेळी उपस्थित जनसमुदायाने राहुल गांधी जिंदाबादचे नारे दिले.

रविवारी महाराष्ट्रातील सुमारे 250 नामवंत साहित्यिकांनीही राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला आहे. त्यांनी हिंगोलीत राहुल गांधी यांची भेट घेऊन पाठिंबा दिला आणि पत्रही दिले. यांनतर राहुल गांधींनी कळमनुरी येथे एका सांस्कृतिक कार्यक्रमात कलाकारांसोबत ढोल वाजवला. त्याचा विडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला.

7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरू झालेली भारत जोडो यात्रा तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमधून आता महाराष्ट्रात आली आहे. महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा १६ दिवस असेल. राहुल गांधींच्या या पदयात्रेला देशभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. खास करून तरुण वर्गाचा भारत जोडो यात्रेत वाढणारा सहभाग लक्षणीय आहे.