हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी हे नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. राहुल गांधी सतत ट्विट करत केंद्रातील मोदी सरकार वर घणाघाती टीका करत असतात . दरम्यान राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ट्वीट करुन भारत आता लोकशाहीप्रधान देश राहिला नाही, असं म्हनत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी त्यांनी एका विदेशी इन्स्टिट्यूटचा हवाला दिला आहे.
यामध्ये भारत आता हुकुमशाही असलेला देश बनला आहे, जितका पाकिस्तान आहे, असं नमूद केलं आहे. तसंच या रिपोर्टमध्ये भारत हा बांगलादेशपेक्षाही खराब असल्याचं नमूद केलं आहे. स्वीडनमधील एका इन्स्टिट्यूटचा डेमोक्रसी रिपोर्टचा हवाला राहुल गांधी यांनी दिला आहे.
India is no longer a democratic country. pic.twitter.com/iEwmI4ZbRp
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 11, 2021
दरम्यान, भाजपकडून राहुल गांधी यांच्या या आरोपाला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. पाश्चिमात्य देशातील नवसाम्राज्यवादी शक्तींना भारताची वाढती ताकद, प्रतिष्ठा आणि विश्वसनियता सहन होत नाही. त्यांच्यासाठी भारतातील एका एजंटच्या रुपात राहुल गांधी काम करत आहेत. असा थेट आरोप भाजप नेते राकेश सिन्हायांनी केला आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा