रायगड : हॅलो महाराष्ट्र – एसटी बस आणि जेएसडबल्यू बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. रायगड जिल्ह्यात हा अपघात घडला आहे. अलिबाग- रेवदंडा मार्गावरील मुरुड येथून एसटी बस सुटली होती. अलिबागच्या दिशेने जाताना हा अपघात घडला. नागावजवळील बागमाळा येथील पेट्रोल पंपाजवळ एसटी आली असता जेएसडबल्यू बससोबत तिची समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडला. या अपघातात दोन्ही बसमधले 55 प्रवासी जखमी झाले आहेत. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. भर रस्त्यात हा अपघात झाल्याने अलिबाग रेवदंडा रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
नेमके काय घडले ?
रायगड जिल्ह्यात एसटी बस आणि जेएसडबल्यू बसचा अपघात झाला. दोन्ही बसची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. मुरुडहून सुटलेली एसटी बस अलिबागच्या दिशेने जात असताना अलिबाग-रेवदंडा मार्गावर बसला अपघात झाला. एसटी बस नागावजवळील बागमाळा येथे पेट्रोल पंपाजवळ आली असताना जेएसडबल्यू बसची आणि एसटीची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला.
हि धडक इतकी भीषण होती कि या अपघातात दोन्ही बसमधील जवळपास 55 प्रवासी जखमी झाले. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भर रस्त्यात हा अपघात झाल्याने अलिबाग रेवदंडा रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. रेवदंडा पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.