अल्पवयीन मुलीसोबत आरोपींचे ‘हे’ दुष्कृत्य; 7 जणांना अटक तर 3 जण फरार

Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रायगड : हॅलो महाराष्ट्र – राज्यात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाऱ्यांच्या घटनांमध्ये मोट्या प्रमाणात वाढ होत आहे. रायगड जिल्ह्यात अशीच हादरवणारी घटना घडली आहे. यामध्ये एका 17 वर्षीय मुलीवर 10 जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हि हादरवून टाकणारी घटना रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वाशी परिसरात घडली आहे. या घटनेतील पीडित मुलगी हि 17 वर्षांची आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, या पीडित मुलीच्या दोन मित्रांनी तिच्यावर शारीरिक अत्याचार केले होते. याची माहिती त्यांच्या मित्रांना कळाली आणि मग त्या मित्रांनी पीडित मुलीला धमकावण्यास सुरुवात केली. यानंतर आरोपींनी पीडित मुलीला धमकी देत तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला.

यानंतर वडखळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरु करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करून 7 जणांना अटक केली आहे. तर 3 आरोपी अजूनही फरार आहेत. या कृत्यात आणखी काही तरुणांचा समावेश असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. फरार असलेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. काही दिवसांपूर्वी बीडमध्ये देखील अशीच एक घटना उघडकीस आली होती. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 400 जणांनी अत्याचार केले होते. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली होती. बालहक्क कार्यकर्त्यांच्या सजगतेमुळे हे प्रकरण उघडकीस आले होते. हि घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई या ठिकाणी घडली होती.