हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Budget 2023 : आता लवकरच सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होणार आहे. यासाठी अवघे काही दिवसच उरले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन या 1 फेब्रुवारी 2023 रोजी संसदेत 2023-24 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. ज्यामुळे या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांकडून नवीन काय घोषणा केल्या जातील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आजकाल रेल्वेच्या संदर्भातील अनेक घोषणा देखील या अर्थसंकल्पातच सादर केल्या जातात, मात्र 2017 पूर्वी भारतीय रेल्वेसाठी एका वेगळा अर्थसंकल्प सादर केला जात असे. 2017 सालापासून तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 92 वर्षांच्या या जुनी प्रथेला फाटा देत रेल्वेचा अर्थसंकल्प हा सर्वसाधारण अर्थसंकल्पाबरोबरच जाहीर करण्यास सुरुवात केली. मात्र यापूर्वी रेल्वेमंत्री सामान्य अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधीच संसदेत रेल्वेचा अर्थसंकल्प सादर करायचे. Budget 2023
नीती आयोगाने दिला सल्ला
नीती आयोगाकडूनही सरकारला ही जुनी प्रथा बंद करण्याचा सल्ला देण्यात आला होता. विविध प्राधिकरणांसोबत बरीच चर्चा आणि विचार केल्यानंतर सरकारकडून रेल्वे अर्थसंकल्प सामान्य अर्थसंकल्पात विलीन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही कल्पना व्यावहारिकही होती कारण आता केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तुलनेत रेल्वे बजेटचा वाटा खूपच कमी आहे. Budget 2023
1924 साली सादर झाला पहिला रेल्वे अर्थसंकल्प
हे जाणून घ्या कि, 1924 मध्ये ब्रिटिश राजवटीत भारताचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. हा पहिला वेगळा रेल्वे अर्थसंकल्प होता. याआधीही सामान्य अर्थसंकल्पासोबतच रेल्वे अर्थसंकल्पही सादर केला जात असे. मात्र 1920-21 मध्ये, एकवर्थ समितीकडून रेल्वे अर्थसंकल्पाबाबत एक अहवाल सादर केला गेला, ज्यामध्ये रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर करण्याचे आणि त्याच्या आर्थिक बाबींवर स्वतंत्रपणे विचार करण्याविषयी सांगितले गेले. Budget 2023
31 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू
यावेळी 31 जानेवारी 2023 पासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल. या वेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. संसदीय कामकाज मंत्री असलेल्या प्रल्हाद जोशी यांनी नुकतीच ही माहिती दिली आहे. या अधिवेशनात एकूण 27 बैठका होणार असून ज्या 6 एप्रिलपर्यंत चालणार असल्याचे जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले. या अधिवेशनाचा पहिला टप्पा 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत वाचलेलं. यानंतर सुमारे महिनाभराच्या विश्रांतीनंतर 12 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होणार असून जो 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे. Budget 2023
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :https://www.indiabudget.gov.in/
हे पण वाचा :
New Business Idea : फर्निचरच्या व्यवसायाद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये !!!
Jio च्या ‘या’ नवीन प्लॅनमध्ये 252 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत मिळणार डेली 2.5GB डेटा
FD Rates : ग्राहकांना बँकांकडून मिळाली नवीन वर्षाची भेट, FD वर देत आहेत जबरदस्त ऑफर
Doorstep Banking म्हणजे काय ??? त्याचा फायदा कोणाकोणाला मिळेल ते जाणून घ्या
अर्थसंकल्पापूर्वी करदात्यांना सरकारकडून भेट !!! आता ‘या’ लोकांना ITR मधून मिळणार सूट