Railway Rules : रेल्वे प्रवाशांना ‘या’ वेळेपर्यंतच आहे झोपण्याची परवानगी, जाणून घ्या त्यासाठीचे नियम

Railway Rules
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Railway Rules : जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी भारतीय रेल्वे एक मानली जाते. देशातील करोडो लोकं दररोज रेल्वेने प्रवास करतात. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेकडून अनेक सुविधा देखील दिल्या जातात. त्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काही नियमही बनवण्यात आले आहेत. रेल्वेतून प्रवास करताना लोकांकडून अनेकदा आरक्षण केले जाते. मात्र रेल्वेतून प्रवास करताना सीटवर झोपण्यासाठी रेल्वेकडून एक ठरविक वेळ निश्चित करण्यात आली आहे. अनेक लोकांना रेल्वेच्या या नियमाची माहिती देखील नाही. चला तर मग आज आपण या नियमाबाबत जाणून घेउयात…

Railway Rule for Passengers: What is the rule of sleeping on the berth in  the train? Know at what time it is necessary to open the middle berth -  Rightsofemployees.com

लोअर बर्थवर झोपण्यासाठीचा नियम

रेल्वे प्रशासनाच्या नियमांनुसार, रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेतच प्रवाशांना त्यांच्या सीटवर झोपण्याची परवानगी दिली गेली आहे. अशा परिस्थितीत, जर आपण लोअर बर्थने प्रवास करत असाल तर आपल्याला रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंतच झोप घ्यावी लागेल. तसेच यानंतर जर एखाद्या सहप्रवाशाने सीटवर बसण्याची मागणी केली तर त्यासाठी आपल्याला नकार देता येणार नाही. त्याच बरोबर रात्रीच्या वेळी 10 वाजण्याआधी आपल्या सीटवरही जाता येणार नाही. Railway Rules

Indian Railways Rule Changed: Night sleeping rule in train has changed,  check the new railway guideline immediately otherwise….. - Business League

मधल्या बर्थवर झोपण्यासाठीचा नियम

रेल्वेकडून मधल्या बर्थवर झोपण्यासाठी देखील नियम निश्चित केला गेला आहे. रेल्वेच्या प्रशासनाच्या नियमांनुसार, जर आपण मधल्या बर्थने प्रवास करत असाल तर आपल्याला रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंतच झोप्या येईल. मात्र यानंतर आपल्याला आपली सीट उघडावी लागेल जेणेकरून सहप्रवाश्यांना सीटवर बसून आरामात प्रवास करता येईल. तसेच जर एखाद्या प्रवाशाने आपल्याला रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत बर्थ उघडण्यापासून रोखले तर आपल्याला रेल्वे किंवा टीटीईकडे तक्रार करता येईल. Railway Rules

Indian Railways To Implement These Rules To Ensure Sound Sleep For  Passengers

TTE ला रात्री प्रवाशांची तिकिटे तपासण्याची परवानगी नाही

हे लक्षात घ्या कि, TTE ला रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत तिकीट तपासण्याची परवानगी मिळत नाही. तसेच रात्री झोपताना प्रवाशांच्या झोपेचा त्रास होऊ नये म्हणून रेल्वेकडून हा नियम करण्यात आला आहे. यासोबतच रात्रीच्या वेळी ट्रेनमध्ये फोनवर बोलणे, गाणी ऐकण्यासही मनाई आहे. Railway Rules

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.irctc.co.in/

हे पण वाचा :
SBI कडून ग्राहकांना धक्का !!! आता बँकेकड्न कर्ज घेणे महागले
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 271 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, जाणून घ्या आजचे नवीन भाव
Multibagger Stocks : 2022 मध्ये ‘या’ 5 कंपन्यांच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल, दिला 2,481% पर्यंत रिटर्न
AU Small Finance Bank : देशातील ‘या’ सर्वात मोठ्या स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या व्याजदरात केली वाढ