नवी दिल्ली । भारतीय रेल्वेने आज पुन्हा एकदा 380 गाड्या रद्द केल्या आहेत. धुक्यामुळे या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यासाठी तुम्ही http://enquiry.indianrail.gov.in/mntes या वेबसाइटला भेट देऊन तपासू शकता. भारतीय रेल्वेने इतक्या मोठ्या प्रमाणात गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही या हंगामात रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या आहेत.
सहसा असा निर्णय रेल्वेकडून हिवाळ्यात घेतला जातो, मात्र यावेळी कोविड-19 आणि धुके या दोन्हीमुळे गाड्या रद्द करण्यात येत आहेत. डिसेंबरच्या शेवटच्या महिन्यापासून देशात धुके सुरू होते. साधारणत: जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये धुक्यामुळे गाड्या चालवण्यात अडचणी येतात. विशेषतः उत्तर भारतात, हवामानामुळे अनेक जलद-सुपर फास्ट गाड्यांचे वेळापत्रक केवळ डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातच बिघडते.
याआधीही रेल्वेने एकाच वेळी 750 हून जास्त गाड्या रद्द केल्या होत्या. शुक्रवारी 380 गाड्या रद्द करण्यासोबतच रेल्वेने अनेक गाड्यांचे वेळापत्रकही बदलले आहे. 4 गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. याशिवाय 6 गाड्यांचे मार्गही वळवण्यात आले आहेत.
आज पुन्हा 380 गाड्या रद्द
सध्या कमी व्हिजिबिलिटी हे देखील गाड्या रद्द होण्यामागचे महत्त्वाचे कारण ठरत आहे. व्हिजिबिलिटीमुळे गाड्यांचा वेग कमी होतो. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये अनेकदा रेल्वेला अशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. उत्तर भारतातील हवामानामुळे या दोन महिन्यांत रेल्वेला मोठा तोटाही सहन करावा लागत आहे.
गाड्या रद्द झाल्याचा परिणाम प्रवाशांवरही होतो. त्यांना पैसे परत केले जातात, मात्र अचानक ट्रेन रद्द झाल्याची बातमी ऐकून त्यांना आणखी त्रास होतो. तुम्ही भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट http://enquiry.indianrail.gov.in/mntes वर जाऊन ट्रेनबद्दल संपूर्ण माहिती मिळवू शकता. तसेच, NTES मोबाईल ऍप्लिकेशन तुमच्यासाठी रेल्वेच्या कोणत्याही माहितीसाठी खूप उपयुक्त ठरू शकते. येथे तुम्ही तुमच्या मोबाईलवर एका क्लिकवर सर्व गाड्यांची लिस्ट आणि त्यांच्याशी संबंधित माहिती मिळवू शकता.