हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Railway ला देशाची जीवन वाहिनी मानले जाते. कारण दररोज लाखो लोकं यातून प्रवास करतात. रेल्वे प्रशासन देखील नागिरकांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा चालवते. मात्र रेल्वेतून प्रवास करताना काही नियम देखील पाळावे लागतात. ज्याचे उल्लंघन केल्यास दंड सोसावा लागू शकतो. मात्र बहुतेक प्रवाशांना असे वाटते की, विनातिकीट प्रवास करणे किंवा विनाकारण चेन खेचून गाडी थांबवण्यासाठीच दंड आकारला जातो. मात्र याबरोबरच इतरही काही कारणे आहे ज्यामुळे आणि प्रवाशांच्या चुकीच्या वर्तनामुळे त्यांना शिक्षा होऊ शकते. यासाठी मोठ्या दंडाबरोबरच तुरुंगाची हवा देखील खावी लागू शकते.
हे लक्षात घ्या की, प्रवाशांची सुरक्षितता हे भारतीय रेल्वेच्या सर्वोच्च प्राथमिकतांपैकी एक आहे. त्यामुळे जर कोणताही व्यक्ती Railway च्या छतावरून प्रवास करताना पकडला गेला, तर त्याला 3 महिने तुरुंगवास, 500 रुपये दंड किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात. रेल्वे कायद्याच्या कलम-156 मध्ये या संबंधित शिक्षेसाठी तरतूद करण्यात आली आहे.
तसेच Railway ट्रॅकवर अतिक्रमण करणे हा देखील रेल्वे कायद्याच्या कलम 1989 च्या 147 नुसार दंडनीय गुन्हा आहे. याचे उल्लंघन करण्यासाठी व्यक्तीला 6 महिन्यांपर्यंत कारावास आणि/किंवा एक हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
त्याचप्रमाणे Railway कायद्याच्या कलम 147 मध्ये चुकीच्या पद्धतीने ट्रॅक ओलांडण्याबाबतही अशाच प्रकारच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. यावर देखरेख करण्यासाठी रेल्वे स्थानके, रेल्वे क्रॉसिंग, रेल्वे अंडर पास, रुळालगतच्या झोपडपट्ट्यांवर खास देखरेख पथकांची नेमणूकही करण्यात आली आहे.
हे लक्षात घ्या कि, चुकीच्या पद्धतीने Railway तिकीट काढणे, तसेच त्याची खरेदी-विक्री करणे आणि तिकिटांची टाउट करणे हा देखील मोठा गुन्हा आहे. तसेच प्रवासादरम्यान किंवा स्टेशन परिसरात एखादी व्यक्ती असे करताना आढळल्यास, त्याला रेल्वे कायद्याच्या कलम-143 नुसार,10,000 रुपये दंड किंवा 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
जर एखादा प्रवासी आपल्याकडे असलेले तिकीट घेऊन अप्पर क्लासच्या डब्यातून प्रवास करताना आढळला तर त्याला Railway कायद्याच्या कलम-138 अंतर्गत शिक्षा होऊ शकेल. यासाठी जास्तीत जास्त अंतरापर्यंतचे भाडे आणि 250 रुपये दंड आकारला जाऊ शकतो. तसेच हा दंड न भरल्यास त्याला ताब्यातही घेतले जाऊ शकते.
याशिवाय देशभरातील कोणतेही रेल्वे स्थानक आणि परिसरात पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही वस्तूंची विक्रीही करता येणार नाही. जर एखाद्या व्यक्ती या नियमाचे उल्लंघन करताना पकडला गेला तर त्याला रेल्वे कायद्याच्या कलम 144 नुसार 2 हजार रुपयांपर्यंत दंड आणि 1 वर्षाची शिक्षा होऊ शकते.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://indianrailways.gov.in/railwayboard/view_section.jsp?lang=0&id=0,1,304,366,523,2530
हे पण वाचा :
Edible Oil : खाद्यतेलाच्या किंमतींतील घसरण सुरूच, जाणून घ्या भाव
‘या’ Multibagger Stock ने अवघ्या 1 महिन्यात शेअरधारकांचे पैसे केले दुप्पट !!!
OnePlus चा ‘हा’ नवीन स्मार्टफोन बाजारात घालणार धुमाकूळ, तपासा किंमत अन् फीचर्स
Airtel ची छोट्या कुटुंबांसाठी खास ऑफर !!! आता एकाच प्लॅनअंतर्गत 4 जणांना मिळेल कनेक्शन
Gold Price Today : उच्च पातळीवरील नफावसुलीमुळे सोन्या-चांदीच्या किंमतीत बदल, पहा आजचे दर