व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पाटणचं राजकारण तापलं! पोलिस प्रशासन अन् सत्यजित पाटणकर यांच्यात झटापट

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
मानवी हक्क संरक्षण समिती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे गट यांच्यावतीने शिंदे-फडणवीस सरकारविरोधा आज पाटण येथील प्रांताधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी निवेदन देण्यासाठी आलेल्या आंदोलकांचे निवेदन स्विकारण्यासाठी प्रांताधिकारी लवकर येत नसल्याने राष्ट्रवादीचे नेते सत्यजित पाटणकर, राजाभाऊ शेलार यांनी पोलिसांचा बंदोबस्त धुडकावून, बॅरिगेट हटवून थेट प्रांताधिकारी कार्यालयात धडक मारली. यावेळी पोलीस आणि त्यांच्यात काही काळ झटापट झाली‌. तसेच प्रशासनाच्या नावाने आंदोलकांनी बोंबही मारली.

यावेळी सत्यजित पाटणकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. पाटणकर म्हणाले की, कदाचित पाटण तालुक्यात कोणताही प्रश्न असला तरी याला राजकारणाच रूप दिले जाते. त्यांना वाटत असेल कि त्यांच्या पार्टीच्या लोकांचे नुकसान होत नाही. किव्हा त्यांच्या पार्टीचा ऊस, मका, ज्वारी, भुईमूग आदी पिकांना डुकरे त्रास देत नसतील. म्हणून ते हे प्रश्न आज मदत नसतील. परंतु तालुक्याच्या भवितव्यासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी राजकारण मध्ये न घेता लोकप्रतिनिधीनी सुद्धा हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडावा. आम्ही यातून काहीतरी मार्ग काढावा.

या ठिकाणी गेल्या दोन तासांपासून सर्व शेतकरी उन्हातून मोर्चाचे काढत आहेत. आज या ठिकाणी उपस्थित असताना आम्ही अर्धा तास झाले उन्हात थांबले आहोत. परंतु निवेदन देत असताना अधिकाऱ्यांनी जो विलंब झाला त्यावरून या गोंधळ उडून गेला. सर्वाना माहिती आहे कि तालुक्याचे राजकारण कोणत्या थराला गेले आहे, अशी प्रतिक्रिया सत्यजित पाटणकर यांनी दिली. तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर राजकारण करत असल्याचा आरोप पाटणकर यांनी यावेळी केला.