पावसाचा अंदाज : पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला हवामान खात्याकडून रेड, ऑरेंज अलर्ट

 मुंबई | बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत आहे. यामुळे मागील आठवड्याभरात मुंबईसह कोकणामधील काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. आता राज्यात रविवार दि. 25 जुलैपर्यंत कोकणासह पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्याला रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असून डोंगरी भागात मुसळधार कोसळत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आलेले असून नागरिकांना स्थलांतर होण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तर सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, पाटण, जावळी, कराड तालुक्यात गेल्या दोन दिवसात सुरू असलेल्या पावसाच्या कमी- जास्त प्रमाणात कोसळत आहे. परंतु हवामान खात्याच्या अंदाजानुसार रेड अलर्टमुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारपट्टीला लगत समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे. पुढील 3 ते 4 दिवस पाऊस राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भात विजांसह जोराचा पाऊस पडण्यात अंदाज हवामान खात्याने यावेळी वर्तविला आहे.

You might also like