विदर्भात सोमवार पर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

पुणे : राज्यात आजपासून कोकण,मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पूर्व मोसमी पावसाचा जोर कमी होणार आहे मात्र काही अंशी ढगाळ वातावरण राहणार आहे. विदर्भातील बहुतांशी भागात सोमवार पर्यंत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.

गेल्या आठवड्यापासून हिमालय पश्चिम बंगाल आणि सिक्कीम ते दक्षिण छत्तीसगड व झारखंड आणि ओरिसा चा परिसर यादरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून 1.5 किलो मीटर उंचीवर आहे. पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहील. दक्षिण केरळची किनारपट्टी ते दक्षिण कोकण व कर्नाटक ची किनार पट्टी या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. मात्र या क्षेत्राचा प्रभाव कमी होऊ लागला आहे. त्यामुळे कोकण मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागात वातावरण काही प्रमाणात कोरडे राहणार आहे उत्तर कर्नाटक व परिसर आणि कोमोरीन परिसर व मध्य प्रदेशच्या वायव्य भागात चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे विदर्भाच्या दिशेने खेचले जाण्याची शक्यता असल्याने विदर्भात तीन ते चार दिवस ढगाळ वातावरण राहील.

मागील 24 तासात सर्वाधिक तापमान अकोला येथे 42.1 अंश सेल्सिअस तर महाबळेश्वर इथं 15.4 सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like