शाब्बास हो ः कोरोनाला हरविण्यासाठी 72 तासांत 2 लाख 70 हजार रूपये जमा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्हयात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन लिंब गावातील ग्रामस्थांनी अनोखा आदर्श समाजासाठी निर्माण केला आहे. मोबाईलवरील व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून लिंब मधील नोकरी निमित्त बाहेर असणाऱ्या देशातील व परदेशातील नोकरदार युवकांनी तसेच ग्रामस्थांनी एकत्र आले आहेत. लिंब परिसरातील वाढती कोरोना बाधितांची संख्या पाहून प्राथमिक आरोग्य केंद्रात कमतरता असणारी औषधे उपलब्ध करण्याच्या दृष्टीने व्हाट्सप ग्रुपवर जनजागृती सुरु झाली. व्हाटसप ग्रुपवर एकमेकांशी याबाबत चर्चा सुरु झाली. त्यास आर्थिक पाठबळाची गरज प्रामुख्याने भासणार असल्याने फक्त 72 तासात गूगल पे आणि फोन पे च्या माध्यमातून एक- एक करत यातील अनेकांनी आपल्या कुवतीप्रमाणे मदत करण्यास सुरवात झाली. बघता बघता तब्बल 170 जणांचे सुमारे 2 लाख 70 हजार 000 रुपये जमा झाले. तर प्रामुख्याने कोरोना बाधित रुग्णांनीही यात मोलाची मदत केली आहे.

या जमा झालेल्या रक्कमेतून लिंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आवश्यक असणारी औषधे, सॅनिटायझर मशीन, सॅनिटायझर, ऑक्सिमीटर, टेम्परेचर गण, खुर्च्या, तसेच रुग्णांसाठी सावलीसाठी मंडपाची सोय करण्यात आली. तर प्रामुख्याने जनमानसात जाऊन काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचारी यांना मानधन दिले. या व्हाटसप ग्रुपमध्ये अजूनही मदतीचा ओघ सुरु आहे.
या साहित्याच्या वितरणाचा कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, वित्त व लेखा अधिकारी विकास सावंत, सरपंच ऍड अनिल सोनमळे, डॉ अरुण पाटोळे, सुनील चिकणे उपस्थित होते.

तर व्हाटसप ग्रुपमधील संदीप सावंत, प्रवीण सावंत, मच्छिंद्र सावंत, संजय सावंत, अशोक माने, विकास सावंत, सचिन सापते, रवींद्र कांबळे, सयाजी सावंत, दयानंद सावंत, चंद्रकांत सावंत, चंद्रकांत तोडरमल, संजय बरकडे, दीपक शिंदे, यांच्यसह व्हाटसप ग्रुपवरील सदस्य तसेच आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात फडतरे यांनी व्हाटसप ग्रुपच्या माध्यमातून होत असलेल्या कार्याचे कौतुक केले. तर वित्त व लेखा अधिकारी विकास सावंत आणि ऍड. अनिल सोनमळे यांनी या ग्रुपचा आदर्श घेऊन इतर गावातील युवकांनी आपले गाव परिसर कोरोनमुक्त करण्याच्या दृष्टीने कार्य करावे असे आवाहन केले. लिंब गावात युवकांसह ग्रामस्थांनी जत्रा साजरी न करता कोरोनाला हद्दपार करण्यासाठी केलेले कार्य कौतुकास्पद आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment