हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आणि वादात सापडलेल्या हर हर महादेव या चित्रपटावरुन राज्यातील वातावरण तापले आहे. या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचा आरोप करत अनेक संघटनांनी या चित्रपटाला विरोध केला आहे. चित्रपटाबाबत राज्यातला गोंधळ पाहता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या प्रवक्त्यांना, कार्यकर्त्यांना महत्वाचे आदेश दिले आहेत. ‘हर हर महादेव’ चित्रपटाबाबत लेखक-दिग्दर्शक अभिजित देशपांडे वगळता मनसेच्या इतर कोणत्याही नेत्याने प्रतिक्रिया देऊ नये, असे आदेश ठाकरेंनी दिले आहेत.
राज ठाकरे यांनी हर हर महादेव चित्रपटावरून होत असलेल्या वादावादीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सध्या चित्रपटाबाबत पक्षच्या एकाही पदाधिकाऱ्यांनी बोलू नये आणि चित्रपटाच्या या प्रकरणाला राष्ट्रवादीकडून जातीय रंग दिला जात आहे, असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.
दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी मांडली भूमिका
‘हर हर महादेव’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी आज चित्रपटाबाबत पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली आहे. आज 11 वाजता अभिजित देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत चित्रपटात आक्षेपार्ह काहीच नाही, असे ते म्हणाले आहेत.