राज ठाकरेंचा मनसैनिकांना नवा आदेश; पत्र ट्विट करत म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी साधारण तीन महिने सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले होते. मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मेळावाही घेण्याचा निर्णय घेतला आहार. मात्र, राज ठाकरे यांनी नुकतेच एक ट्विट केले असून त्यांनी प्रसिद्धी पत्रकातून उद्या बुधवारी होणारा मेळावा हापुढे दकळत असल्याचे सांगितले आहे. तसेच मनसैनिकांना सूचना व काही आदेशही दिले आहेत.

राज ठाकरे यांनी मनसेचा बुधवारी मेळावा घेणार असल्याची घोषणा काल केली होती. त्यानंतर मनसैनिकांकडून मेळाव्याची जय्यत तयारी हि केली जात होती. मात्र, राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मेळावा पुढे ढकलत असल्याचे आज राज ठाकरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.

पत्रात राज ठाकरे यांनी म्हणले आहे की, राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. असा परिस्थितीत मी उद्या जो कार्यक्रम तुम्हा सर्वांना सांगणार होतो तो सांगितला तरी प्रत्यक्षात आणता येणे अवघड आहे. त्यामुळे आपण उद्या होणारा मेळावा पुढे ढकलत आहोत, असे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.

मनसेचा मेळावा पुढे ढकलला असला तरीही राज ठाकरे लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी ते सध्याच्या राजकीय परिस्थिती आणि आगामी नगरपालिका निवडणुकांसंदर्भात काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पूर आलेल्या भागात मदतकार्य हाती घ्या !

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मनसैनिकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे राज्यातील कहाणी भागात पूरस्थिती निर्माण झाल्यास त्याठिकाणी मदतकार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. स्वतःची तर काळजी घ्याच परंतु अतिवृष्टीमुळे जिथे लोकांना त्रास होतो आहे तिथेही तुम्ही लोकांसाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा. मुख्यतः नदीकाठाला जिथे लोक रहात आहेत तिथल्या घरांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे. तिथे अन्नधान्य, पिण्याचं शुध्द पाणी, अंथरूण-पांघरूण (सर्वत्र ओल असते) पुरवावं लागेल. एक लक्षात घ्या की, अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणा प्रचंड कामात असतात त्यामुळे त्यांच्यावर विनाकारण ताण येईल, असे काहीही करू नका, असे राज ठाकरे यांनी मनसैनिकांना सांगितले आहे.

Leave a Comment