हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे प्रमुख राज ठाकरे यांची महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेला औरंगाबाद पोलिसांनी अटींसह परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सभा होण्यापूर्वीच आता त्याला विरोध करण्यात आलेला आहे. राज ठाकरे यांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे, अटींचे पालन न केल्यास सभा उधळून लावण्याचा इशारा भीम आर्मीकडून देण्यात आला आहे.
1 मे रोजी औरंगाबाद या ठिकाणी होणाऱ्या राज ठाकरे यांच्या जाहीर सभेची सध्या जय्यत तयारी मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. सभेपूर्वी या सभेला परवानगी मिळणार का? असा प्रश्न पडला होता. मात्र, पोलिसांनी सभेला परवानगी दिली आहे. मात्र, राज ठाकरे यांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे, अटींचे पालन न केल्यास सभा उधळून लावण्याचा इशारा भीम आर्मीकडून देण्यात आला आहे. तर राज ठाकरे यांच्या सभेला आरपीआयनेही विरोध दर्शवला आहे.
राज ठाकरे यांना पोलीस प्रशासनाकडून सभेबाबत 16 अटी देण्यात आलेल्या आहेत. त्या अटींचे उल्लंघन झाल्यास भीम आर्मीकडून महापुरुषांच्या नावाच्या घोषणा सभेच्या ठिकाणी दिल्या जातील अशी माहिती भीम आर्मीचे नेते अशोक कांबळे यांनी दिली आहे. दरम्यान, सभास्थळी 15 हजार इतकी आसनमर्यादा ही देण्यात आलेली आहे. त्यामुळे 15 हजार पेक्षा जास्त जणांना आमंत्रित करु नये. जास्त नागरिकांना आमंत्रित करुन चेंगराचेंगरी किंवा इतर दुर्घटना घडल्यास आयोजकांना दोषी धरले जाणार आहे.
‘आरपीआय’कडून याचिका दाखल
राज ठाकरे यांच्या सभेवर बंदी घालावी यासाठी रिपब्लिकन युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जयकिशन कावळे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. वकील अजय कानवडे यांच्यामार्फत कांबळे यांनी याचिका दाखल केली. या याचिकेच्या सुनावणीनंतर न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.