हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| 9 एप्रिल रोजी मनसे (Manase) पक्षाचा मुंबई भव्य गुढीपाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला (महायुती) बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात ही चर्चांना उधाण आले. तसेच एकेकाळी भाजपला (BJP) विरोध करणारे राज ठाकरे आज महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी कसे तयार झाले? असा सवाल देखील विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवरच स्वतः राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा देण्याचे मुख्य कारण सांगितले आहे.
महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केल्यानंतर आज राज ठाकरेंची आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत महत्त्वाचे बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मनसेने महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय कोणत्या कारणासाठी घेतला हे स्पष्टपणे सांगून टाकले. राज ठाकरे म्हणाले की, “गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने राम मंदिर, कलम 370 सारखे निर्णय घेतले. पंतप्रधान मोदी नसते तर राम मंदिर निर्माण झाले नसते”
त्याचबरोबर, “पंतप्रधान मोदी गुजरातचे आहेत त्यामुळे त्यांचं गुजरात प्रेम स्वाभाविक आहे. इतरही राज्यांकडे ते लक्ष देतील अशी अपेक्षा आहे. आता पुढे त्यांची पावले कशी पडतात हे पाहणं गरजेचं आहे. आता मी जो पाठिंबा दिलाय त्यासंदर्भात पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली आहे. आता पुढे महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या लोकांनी आमच्या कोणत्या लोकांशी संपर्क साधायचा आणि पुढे कसं जायचं हे एक दोन दिवसात ठरेल.आमच्या पदाधिकाऱ्यांना महायुतीत योग्य वागणूक देतील अशी अपेक्षा आह” असे राज ठाकरे ययांनी सांगितले.
तसेच, “महायुतीच्या सभांबाबत अद्याप काहीही ठरलेले नाही. त्यामुळे याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. ज्यांना आम्ही हा निर्णय का घेतला हे समजत नसेल तर त्यांनी त्यांचा वैयक्तिक निर्णय घ्यावा. पाठिंबा देताना मला पक्षाचा. ही विचार करावा लागतो.” असे राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, मध्यंतरी राज ठाकरे यांनी दिलेला जाऊन केंद्रिय मंत्री अमित शहा यांचे भेट घेतली होती. तेव्हापासून राज ठाकरे हे भाजपमध्ये जातील अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत होते. परंतु गुढीपाडव्याच्या दिवशी घेतलेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली. त्यामुळे सध्या अनेकजण राज ठाकरेंच्या या निर्णयाचे समर्थन करत आहेत तर काहीजण त्यांच्यावर टीकाही करत आहेत.