हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र व मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांना वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अंगात ताप असल्यामुळं खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.तसेच घाबरण्याचं कारण नाही असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. गेल्या 2 दिवसापासून अमित ठाकरे यांना ताप जाणवत होता.
लिलावती रुग्णालयात दाखल केल्यानंतर अमित ठाकरे यांच्या काही तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल नेगेटिव्ह आला आहे. तसेच मलेरिया आणि इतर चाचण्याही निगेटिव्ह आल्या आहेत. डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की, हा ताप व्हायरल असण्याची शक्यता आहे. परंतु, सध्याचा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुढील एक दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहितीही डॉक्टरांनी दिली.
अमित ठाकरे यांनी कोरोना काळात अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या, अंगणवाडी सेविकांचा प्रश्न त्यांनी राज्य सरकारकडे मांडल्या होत्या, त्यानंतर डॉक्टरांच्या शिष्टमंडळानेही अमित ठाकरेंची भेट घेऊन अपुऱ्या वेतनाबाबत समस्या मांडली होती, त्यानंतर अमित ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना याबाबत पत्र लिहिलं होतं, आरे येथील मेट्रो कारशेड बाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचं अमित ठाकरेंनी स्वागत केले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’