मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे पुन्हा संतापले; म्हणाले, काम करायचं नसेल तर…

Raj Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेच्या वतीने आज मुंबईतील वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. ‘तुम्हाला निट काम करायचं नसेल तर पदावर काशाला राहाता? पदावरुन दूर व्हा,” अशा शब्दांत ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना खडसावले.

बैठकीवेळी राज ठाकरे म्हणाले की, विभागीय पातळीवर जे पदाधिकारी पक्षाचे काम करत नाहीत, त्यांची यादी बनवण्याचे आदेश विभाग प्रमुखांना दिले आहेत. आगामी काळामध्ये सर्वांनीच कामामध्ये सुधारणा करावी, लोकांपर्यंत जावून कामं करावे.

मनसेकडून आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी केली जात आहे. निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांच्याकडून पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या जात आहेत. दरम्यान आजच्या बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले.