Tuesday, January 31, 2023

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द करण्यामागे भाजपचा हात; मनसेच्या आरोपाने खळबळ

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टीका केल्यांनतर आता मनसेच्या आणखी एका बड्या नेत्याने भाजपवर गंभीर आरोप केला आहे. राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द करण्यामागे भाजपचा (BJP) हात आहे, महाराष्ट्र भाजपही या पापात सहभागी आहे असा थेट आरोप मनसेचे दिग्गज नेते प्रकाश महाजन यांनी केलाय. त्यामुळे भाजप आणि मनसेत सर्व काही आलबेल नाही असंच दिसत आहे.

प्रकाश महाजन म्हणाले, जेव्हा राज ठाकरेंनी हिंदूत्वाची भूमिका स्वीकारली तेव्हा भाजपाच्या एका टिनपाट गुंडाने अयोध्येत न येण्याची धमकी त्यांना दिली. तेव्हा ही लोकं गप्प होती. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द करण्याच्या पापात भाजप सामिल आहे.

- Advertisement -

आता नवीन राज्य आल्यानंतर सर्व लोक शिवतीर्थवर येतात. मात्र या सरकारला काही वाटत नाही की राज ठाकरेंवर असलेल्या खोट्या केसेस मागे घ्याव्यात. राज ठाकरेंवरील जुन्या केसेस मागे घेतल्या नाही तर या शिंदे-फडणवीस सरकारला त्यांची जागा दाखवून देवू, असा थेट इशारा महाजन यांनी दिला. प्रकाश महाजन यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे भाजप आणि मनसेमध्ये काही बिनसलं आज का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.