राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेची तारीख ठरली; ‘या’ दिवशी होणार जाहीर सभा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्याकडून पुण्यातील नदीपात्राच्या परिसरात सभा घेणार असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच ते सभा कधी घेणार? ते सभेतून कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अयोध्या दौऱ्यापूर्वी होणारी ही सभा अत्यंत महत्वाची मानली जात असून आता राज ठाकरे यांची सभा हि 22 मे रोजी सकाळी 10 वाजता सभा आणि पुण्यातच होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

राज ठाकरे यांच्याकडून आज पुण्यातील मनसे पधाधिकाऱ्याची बैठक घेण्यात आली. या बैठकीत त्यांनी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पुण्यातील सभेच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी सभेच्या कामाबाबत माहितीही घेतली. यानंतर त्यांनी सभा कधी व कुठे घेणार? याबाबत आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाईल असे सांगितले. मात्र, ते पुण्यातील गणेश कला, क्रीडा मंच सभागृहात 22 मे रोजी सभा घेणार असून याची जय्यत तयारी मनसे पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे.

अयोध्येच्या दौऱ्यापूर्वी साधणार निशाणा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून 5 जूनला अयोध्या दौरा केला जाणार आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्याला अयोध्येतील साधू संत, तसेच भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचा विरोध आहे. यावर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. सर्व विरोधानंतरही राज ठाकरे अयोध्येला जाण्यावर ठाम आहेत. मनसेच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू झाली आहे. यासाठी 11 रेल्वेचे बुकिंग करण्यात येत आहे. राज ठाकरे अयोध्येत पोहोचण्यापूर्वी मनसे कार्यकर्ते तेथे पोहोचणार आहेत. तत्पूर्वी राज ठाकरे पुण्यातील सभाईतून कोणावर निशाणा साधणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment