पुणे : हॅलो महाराष्ट्र – गुढीपाढव्यादिवशी झालेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणामुळे आणि त्यामधील काही वादग्रस्त मुद्द्यावरून राज्यभरात मोठे पडसाद उमटले आहेत. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मशिदींवरील भोंग्यांना विरोध करण्यापासून मदरश्यांवर तसेच मशिदींवर छापे टाकण्यासंदर्भातील वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यात संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. तसेच त्यांचा या वक्तव्यामुळे मुस्लिम समाज नाराज झाला आहे.
राज ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे अनेक मनसे पदाधिकाऱ्यांनी राजीनामेही दिले आहेत. यामुळे राज यांच्या या वक्तव्यावरुन मनसेमध्येच दुमत असल्याचे दिसत आहे. मशिदींवरील भोंग्यांच्या संदर्भातील वक्तव्यामुळे पुण्यातील कोंढावा येथे राज ठाकरे यांनी उदघाटन केलेल्या एका कब्रस्तानामधील शिलेवरील त्यांचं नाव मुस्लिमांकडून काढून टाकण्यात आले आहे.
राज ठाकरेंच्या त्या वक्तव्यामुळे मुस्लिमांनी त्या उदघाटन शिलेवरून राज ठाकरेंचे नाव खोडले pic.twitter.com/sp8vlQnVJx
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) April 6, 2022
2013 मध्ये राज ठाकरेंच्या हस्ते कोंढवा येथील नुराणी कब्रस्तानमधील सुविधांचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र आता राज ठाकरे यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या आपल्या नव्या राजकीय भूमिकेमुळे मुस्लीम समाजामध्ये नाराजी निर्माण झाली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये मशिदींबरोबर अजान आणि मुस्लीम समजाचा अपमान केल्याचा दावा करत अज्ञातांनी या कब्रस्तानामधील विकासकामांच्या उद्घाटन शिलेवरील राज यांचे नाव खोडून काढले आहे. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.