हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी जोरदार पुढाकार घेतला असून समाजाची भावना जाणून घेण्यासाठी ते सध्या राज्यभर दौरा करत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नंतर आता त्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं हेच राज ठाकरेंचं मत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.
संभाजीराजे म्हणाले, राज ठाकरेंची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. ते जात-पात मानत नाहीत. पण गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं या मताचे ते आहेत. माझ्या भूमिकेला ते समर्थन देखील करतात. राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे हे जिवलग मित्र होते. ते नातं छत्रपती घराण्याचं आणि ठाकरे घराण्याचं आजही आहे. राज आणि माझा कॉमन पाईंट आहे असे संभाजीराजेंनी म्हंटल.
मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेत आहे. मराठा हा प्रमुख समाज आहे. त्यांचं आरक्षण रद्द झालंय. आता त्यावर मार्ग काढायचा आहे. हा मात्रा एकट्याचा विषय नाही. तर समाजाला न्याया मिळावा हा मुद्दा असल्याचं संभाजीराजे म्हणाले.शिवाय किल्ल्यांचं संवर्धन आणि जतन या मुद्द्यावर देखील आमचं एकमत आहे. त्यामुळे किल्ल्यांचं जतन आणि संवर्धन कसं करता येईल, यावर देखील आमची चर्चा झाली”, असं संभाजीराजे म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.