हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Raj Uddhav Alliance । मुंबईत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची घोषणा नेमकी कधी होणार याबाबत मुंबईकरांच्या मनात मोठी उत्सुकता लागून राहिलेली आहे. दोन्ही पक्षाकडून मागील काही दिवसापासून जागावाटपावर चर्चा सुरु आहेत. मात्र अधिकृतरीत्या राज आणि उद्धव ठाकरेंची युती कधी होणार हे स्पष्ट होत नव्हते. मात्र आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करत संपूर्ण महाराष्ट्राला ब्रेकिंग न्यूज दिली आहे. ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त संजय राऊतांनी जाहीर केला आहे. \
काय आहे संजय राऊत यांचे ट्विट – Raj Uddhav Alliance
संजय राऊत यांनी त्यांच्या सोशलं मीडियावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो शेअर केला आहे. त्यावर त्यांनी कॅप्शन लिहिलं आहे ते उद्या १२ वाजता… याचा अर्थ उद्या दुपारी १२ वाजता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची घोषणा होणार आहे. तब्बल २० वर्षानंतर राज आणि उद्धव ठाकरे निवडणुकीत एकत्र दिसतील. Raj Uddhav Alliance मराठी माणसासाठी, महारष्ट्रासाठी आणि मुंबई वाचवण्यासाठी आम्ही एकत्र येतोय असं दोन्ही पक्षाकडून यापूर्वीच सांगण्यात आलं होते. अखेर आज अधिकृतरीत्या ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊत यांच्या ट्विटमुळे शिक्कामोर्तब झालं आहे.
मुंबईत कोण किती जागा लढवणार?
मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना १५० जागांच्या आसपास उमेदवार उभे करेल तर राज ठाकरेंच्या मनसेला ६५ ते ७० जागा मिळतील असं बोललं जात आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ठाकरे बंधूंसोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास त्यांनाही दोन्ही बाजूनी काही जागा देण्यात येतील. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 2017 च्या निवडणुकीत जिंकलेल्या 12 ते 15 जागा राज ठाकरे यांच्या मनसेसाठी सोडल्या आहेत. या जागांवरील माजी नगरसेवक हे आता शिंदे गटात गेले आहेत. त्याठिकाणी उद्धव ठाकरेंकडे प्रभावी असा चेहरा नाही, तुलनेत या जागांवर मनसेकडे ताकदवान उमेदवार उपलब्ध आहेत. त्यामुळे या जागा मनसेला सोडण्यात आल्या आहेत. शिवडी, दादर, माहीम, भांडुप, विक्रोळी मतदारसंघातील काही जागांवरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये रस्सीखेच सुरू होती . कारण हे सगळे भाग मराठीबहुल आहेत. मात्र तिथेही दोन्ही पक्षाकडून एकमत झालं आहे . (BMC Election 2026 ) शिवडी, दादर आणि माहीममधल्या बहुतांश प्रभागांचा तिढा सोडवण्यात दोन्ही पक्षांना यश आलं आहे. परंतु भांडूप, कांदिवली, बोरिवली, मुलुंड परिसरातील काही वॉर्डांमधील तिढा अजूनही सुटलेला नाही.




