सचिन पायलट दिल्लीत दाखल; राजकीय तिढा सोडवण्यासाठी प्रियांका गांधी करणार मध्यस्थी?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था: उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितीन प्रसाद यांनी भाजपा पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर सचिन पायलट यांच्या देखील भाजपा प्रवेशाबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजपच्या उत्तर प्रदेश मधील नेत्या रिटा बहुगुणा जोशी यांनी पायलट लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र सचिन पायलट हे वृत्त यांनी फेटाळून लावले आहे. त्यानंतर पायलट अचानक दिल्लीत दाखल झाले आहेत. शुक्रवारी रात्री पायलट दिल्लीत पोहोचले. काँग्रेसचे वरिष्ठ नेते पायलट यांच्या संपर्कात असून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी या राजस्थानातील राजकीय तिढा सोडवण्यासाठी मध्यस्थी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे सचिन पायलट आणि त्यांच्या गटाची नाराजी दूर करण्यात प्रियंका गांधी आणि काँग्रेस नेत्यांच्या प्रयत्नांना किती दिवसात यश येणार आहे याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.

काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर

राजस्थानातील काँग्रेसमधील अंतर्गत कलह आता पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे दिसत आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर नाराजी व्यक्त करत काही महिन्यांपूर्वी सचिन पायलट यांनी बंडखोरीचे रंग दाखवले होते. मात्र त्यांची मनधरणी करण्यात काँग्रेसला यश आलं. आता पुन्हा एकदा पायलट भाजपच्या संपर्कात असल्याचे समोर येत आहे. याबाबतच्या चर्चांना चांगलंच उधाण आले आहे. पण पायलट यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. सचिन पायलट दिल्लीत दाखल झाले आहेत. पायलट यांची प्रियंका गांधींकडून मनधरणी करण्यात केली जाणार असल्याचे वृत्त असून दिल्लीतील घडामोडींकडे राजकीय वर्तुळात सध्या लक्ष आहे

गेहलोत विरुद्ध पायलट संघर्ष

राजस्थान काँग्रेस मध्ये गेहलोत विरुद्ध पायलट यांचा अंतर्गत संघर्ष असून हा संघर्ष गेल्या काही महिन्यात दुसऱ्यांदा उफाळून येताना दिसतो आहे. यापूर्वी गेल्या वर्षी जुलैमध्ये असाच संघर्ष पहायला मिळाला होता. मात्र हे बंड शमवण्यात काँग्रेसला यश आलं होतं. गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार करून त्यात आपल्या निष्ठावंतांना संधी दिली जावी अशी मागणी पायलट त्यांच्याकडून केली. सध्या मात्र मंत्रिमंडळ विस्तार व इतर अनेक गोष्टींना विलंब होत असल्याने पायलट गटानं नाराजीचा सूर ओढला आहे.

Leave a Comment