राजस्थानमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 3 महिलांचा गुदमरुन मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

राजस्थान : वृत्तसंस्था – राजस्थानमध्ये झालेल्या एका जत्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत (stampede) 3 महिलांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. जखमी महिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राजस्थानच्या सीकर येथे असलेल्या खाटूश्यामजी मंदिरात दर महिन्याला जत्रा भरते. या जत्रेदरम्यान हि दुर्घटना घडली. या मासिक जत्रेसाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीदरम्यान गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी (stampede) होऊन तीन महिलांचा गुदमरुन जागीच मृत्यू झाला. आज सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. श्रावणी सोमवार असल्याने अनेक भाविक दर्शनासाठी मंदिरात दाखल झाले होते.

या भीषण दुर्घटनेत (stampede) जीव गमावलेल्या महिलांपैकी एक महिला ही हिसारची असल्याची माहिती समोर आली आहे. तर अन्य दोन महिलांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. या चेंगराचेंगरीत (stampede) जखमी झालेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी जयपूरला पाठवण्यात आले आहे. तर एका महिलेवर खाटू श्यामजी स्थानिक रुग्णालयातच उपचार सुरु आहेत.

खाटू श्यामजी मंदिरात घडलेल्या दुर्घटनेनंतर (stampede) सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील दुःख व्यक्त केले आहे. तसंच जखमी भाविक लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी त्यांनी ईश्वरचरणी प्रार्थनाही केली आहे. याबरोबरच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही या दुर्घटनेबाबत (stampede) शोक व्यक्त केला आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल

शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय

Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???

सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???

ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!