हावरटपणा चांगलाच नडला ! नोकरी गेली, प्रॉपर्टी गेली आणि बायकोसुद्धा पळून गेली

0
138
Dowery
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जयपूर : वृत्तसंस्था – लग्नाच्या पहिल्याच वाढदिवशीच नवऱ्याला चांगलेच गिफ्ट भेटले आहे. या दिवशी बायको ब्यूटी पार्लरला जाण्यासाठी घराबाहेर पडली ती परत आलीच नाही. यानंतर नवऱ्याने तिचा शोध घेण्यास सुरुवात केली पण तिचा कुठेच पत्ता लागला नाही. यानंतर आपली बायको फरार झाल्याची त्याला कल्पना आली. यानंतर तो लगेच बायकोच्या माहेरी आग्रा येथे गेला. पण तिच्या माहेरच्या लोकांनी दरवाजा उघडला नाही. त्याची बायको आपल्याच माहेरी पळून गेली होती.

काय आहे प्रकरण
हि घटना राजस्थानमधील आहे. अविनाश वर्मा या तरुणाचे उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील सुलहकुल नगरमध्ये राहाणाऱ्या एका तरुणीशी एका वर्षापूर्वी विवाह झाला होता. अविनाश हा पेशाने अकाउण्टंट असून त्याचे वडील सेवानिवृत्त नायब तहसीलदार होते. मात्र एवढी चांगली नोकरी असतानादेखील अविनाश हुंड्यासाठी आपला छळ करत असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने आयोगाकडे केली होती. या प्रकरणाची चौकशी अजमेर पोलिस करत आहेत.

यानंतर काही दिवसांनी अजमेर पोलीस अविनाशच्या घरी पोहोचले. तेव्हा अविनाशच्या आई-वडिलांनी त्याला संपत्तीतून बेदखल केले तसेच त्याला आपली नोकरीही गमवावी लागली. काही दिवसांनी त्याची बायको त्याच्याबरोबर फोनवर बोलू लागली, मात्र नांदायला यायला ती तयार होत नव्हती. यानंतर अविनाश बायकोचा अंतिम निर्णय जाणून घेण्यासाठी तिच्या घरी गेला. पण अविनाश जेव्हा बायकोच्या माहेरी गेला तेव्हा त्याची बायको नातेवाईकांच्या घरी निघून गेली. पण तरीदेखील अविनाश तिच्या घराबाहेर 31 तास ठिय्या मांडून बसला होता. अविनाशची हि अवस्था पाहून शेजाऱ्यांना त्याची दया आली व त्यांनी अविनाशच्या झोपण्याची व्यवस्था केली. अविनाश बराच काळ घराबाहेर बसून होता पण बायकोने शेवटपर्यंत दार उघडले नाही त्यामुळे अविनाशला रिकाम्या हातानी परत यावे लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here