हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून जनतेच्या चिंतेत भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी ऑनलाईन संवाद साधत राज्यांना काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे. त्याच पाश्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मास्क बाबत मोठं विधान केलं आहे. राज्यात सध्या तरी चिंतेची परिस्थिती नाही पण रुग्णसंख्या वाढली तर मास्क सक्ती करण्यात येईल असे राजेश टोपे यांनी सांगितले. महाराष्ट्र दिनानिमित्त राजेश टोपे यांच्या हस्ते जालन्यात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते
राजेश टोपे म्हणाले, राज्यात सध्या चिंता करण्यासारखी परिस्थिती नाहीये. महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या कमी असून रुग्णसंख्येच्या बाबतीत राज्य आठव्या क्रमांकावर आहे. परंतु रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढल्यास आपल्याला मास्कसक्ती करावी लागेल, असा थेट इशारा राजेश टोपे यांनी दिला आहे.
दरम्यान, तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सध्याच्या कोरोना परिस्थितीवर भाष्य करत टास्क फोर्सने जर तशा स्वरूपाच्या पुन्हा निर्बधांबाबत सूचना केल्यास राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू केले जाऊ शकतात,” असे म्हंटले आहे. महाराष्ट्रात उष्णतेची लाट आहे. अशात कोरोनाच्या रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. अशा परिस्थितीत लोकांनी काळजी घ्यावी. असे आवाहन अजित पवारांनी केलं