हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत असून सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकार कडून मुंबईत नाईट कर्फ्यू लावला जाऊ शकतो असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत हा नाईट कर्फ्यू लावला जाऊ शकतो असे टोपे यांनी म्हंटल.
दुसऱ्या लाटेप्रमाणे चिंताजनक परिस्थिती सध्या तरी नाही, पण काळजी घेतली पाहिजे. कोरोना प्रसार रोखण्यासाठी निर्बंध लावलेले आहेत. त्यामुळं आपण नियम पाळले नाहीत तर अवघड आहे. रात्री फिरण्याची गरज नाही. मुंबई सारख्या शहरात रात्री 11 ते 5 या वेळेत काही निर्बंध लावता येते का हे पाहावं लागेल, असं राजेश टोपे म्हणाले.
जनतेने गर्दी टाळणे गरजेचे आहे. त्यामुळे संसर्ग कमी होईल. चित्रपट, नाट्यगृह आणि मंदिर याबाबत लगेचच निर्बंध लावण्याचा प्रस्ताव नसून गरज पडली तर निर्बंध लावले जातील.तसेच मुंबई लोकल बंद करण्याबाबत अद्याप कोणताही विचार झाला नसल्याचे राजेश टोपे यांनी म्हंटल