जयपूर । राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारवरील अस्थिरतेचं संकट अजूनही कायम आहे. सध्या न्यायालयात हा वाद असून, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्याविषयी बोलताना अशोक गेहलोत यांना संताप अनावर झाला. सचिन पायलट हे मागील ६ महिन्यांपासून भाजपासोबत मिळून कट रचत होते. जेव्हा मी याबद्दल बोलायचो, तेव्हा कुणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही,” अशी टीका मुख्यमनातरी गेहलोत यांनी केली.
सध्या काँग्रेसचे आमदार राजस्थानच्या एका हॉटेलमध्ये असून, सचिन पायलट यांच्याविषयी माध्यमांशी बोलताना अशोक गेहलोत भडकले. “ते (सचिन पायलट) भाजपाच्या पाठिंब्यानं मागील ६ महिन्यांपासून कट रचत होते. सरकार पाडण्यासाठी कट शिजत असल्याचं जेव्हा मी सांगत होतो, तेव्हा कुणीही माझ्यावर विश्वास ठेवत नव्हतं. कुणालाही माहिती नव्हतं की इतका निष्पाप चेहरा असलेली व्यक्ती असं करेल. मी इथे भाजीपाला विकायला नाहीये. मी मुख्यमंत्री आहे,” अशा शब्दात गेहलोत यांनी आपला संताप व्यक्त केला.
He (Sachin Pilot) was conspiring from past 6 months with BJP's support. Nobody believed me when I used to say that conspiracy is going on to topple govt. Nobody knew that a person with such innocent face will do such thing. I'm not here to sell vegetables, I am CM: Rajasthan CM pic.twitter.com/Kk4TLJZ0v0
— ANI (@ANI) July 20, 2020
दरम्यान, राजस्थान विधानसभा अध्यक्षांनी सचिन पायलट यांच्यासह १८ आमदारांना बजावलेल्या नोटीसीवर उच्च न्यायालयात सुनावणी आहे. उच्च न्यायालय काय निकाल देते यावर राजस्थानातील राजकीय गणित ठरणार आहेत. उच्च न्यायालयानं आधीच अपात्र करण्याच्या नोटीसीवर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिलेले आहेत. त्यामुळे मंगळवारपर्यंत या नोटीसीवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”