महाराष्ट्रातील काँग्रेस नेते तुमचं ऐकत नाहीत का? राजू शेट्टींचं राहुल गांधींना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी भूमी अधिग्रहण कायद्यावरुन महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांविषयी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच महाराष्ट्रातील काँग्रेस नेते तुमचं ऐकत नाहीत का? असा सवाल त्यांनी केला.

राजू शेट्टी पत्रात काय म्हणतात-

२०१३ मध्ये काँग्रेसने तयार केलेल्या भूमी अधिग्रहण कायद्यात २०१५ ला मोदी सरकार दुरुस्ती करत बदल करणार होतं. तेव्हा तुमच्या पक्षाने शेतकऱ्यांना साथ देत त्याचा विरोध केला होता. पण महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने या कायद्यात दुरुस्ती करत शेतकरीविरोधी भूमी अधिग्रहणाचा कायदा केला. काँग्रेसचं धोरण बदललं आहे की, महाराष्ट्र काँग्रेसचे नेते तुमचं ऐकत नाहीत? असा सवाल राजू शेट्टी यांनी राहुल गांधी यांना केला.

शेतकऱ्यांची जमीन संपादित करताना नुकसान भरपाई निम्म्याने कमी करण्याचा ठराव करून सध्याच्या राज्य सरकारने यूपीए सरकारने मंजूर केलेल्या धोरणातच बदल सुचवले आहे. यामुळे असे दिसते की आता महाराष्ट्र सरकार मोदीजींना पाठिंबा देत आहे अगदी हा कायदा केलेल्या खात्याचे राज्याचे महसूल मंत्री आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे कॉंग्रेसचे आहेत.  हा कायदा लागू झाल्याने शेतकऱ्यांचे सर्वस्व गमावले आहे.

माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की महाराष्ट्र सरकारने नुकतीच केलेली दुरुस्ती मागे घेण्यास महाराष्ट्र नेतृत्वाला सूचना द्या. मला आशा आहे की तुम्ही या प्रकरणाकडे नक्कीच लक्ष द्याल आणि गरीब शेतकर्‍यांना मदत कराल राज्यातील शेतकऱ्यांच्या कुटूंबाची उपजीविका या भरपाईच्या रकमेवर पूर्णपणे अवलंबून आहे, असं शेट्टी यांनी म्हटलं आहे.

Leave a Comment